तुषार सिंचन ही पद्धत पिकांना पावसासारखे पाणी देण्यासाठी वापरली जाते. या पद्धतीत, पाणी पाईपच्या प्रणालीद्वारे वितरीत केले जाते. या पद्धतीत, बारीक वेज असलेल्या तोटीद्वारे (स्प्रिंकलर नोझल) पाण्याचा दाबाचा वापर करून पाणी पिकावर फवारले जाते.
तुषार सिंचनाची वैशिष्ट्ये:
- तुषार सिंचन पद्धतीत पाण्याचा नाश होत नाही.
- प्रवाही सिंचनापेक्षा सिंचन क्षमता जास्त मिळते.
- तुषार सिंचन पद्धत जवळजवळ सर्व पिकांच्या सिंचनासाठी वापरता येते.
- स्प्रिंकलर लहान ते मोठ्या क्षेत्रासाठी कार्यक्षम कव्हरेज देतात.
- झाडाच्या पृष्ठभागावर पाणी गोठते आणि बर्फाचा थर तयार होतो जो झाडाचे दंवापासून संरक्षण करतो.
तुषार सिंचनाचे फायदे
१. प्रवाही सिंचनापेक्षा सिंचन क्षमता जास्त मिळते.
२.तुषार सिंचन पद्धत जवळजवळ सर्व पिकांच्या सिंचनासाठी वापरता येते.
३. पाण्याची २५ ते ३५% बचत होते
४.पाणी सर्व ठिकाणी ठिकाणी समप्रमाणात पाहिजे तेवढे देता येते.
५. तुषार पद्धतीत पाण्याचा नाश होत नाही.
६. पावसासारखे पाणी पिकांवर पडते त्यामुळे काही किडी-रोग धुऊन जातात.
७. पाने आणि ताटे स्वच्छ राहतात.
८. द्रवरूप रासायनिक खाते तुषार-सिंचनाद्वारे देता येतात. खाते पिकाच्या मुळाशी पडतात. त्यामुळे खताचा कार्यक्षम वापर होऊन बचत होते.
९. ठिबक सिंचन पद्धतीपेक्षा दरएकरी खर्च कमी येतो..
१०. जमीन सपाट करण्याची अगर रानबांधणीची गरज नसते.
११. मजुरीवरचा खर्च कमी येतो.