शेतीकामासाठी लागणारे मनुष्यबळ तसेच शेतीस अवेळी होणारी पाणीटंचाई यांवर मात करण्यासाठी व शेती फायदेशीर होण्यासाठी एक शाश्वत उपाय म्हणजेच बांबूची शेती होय. शेतक-यांनी बांबूची लागवड थांबते, पर्यायाने जमिनीचा पोत सुधारतो.
फायदे
- बांबू हा जलद वाढणारा गवताचा प्रकार असून त्यांच्या लवचीक व दणकट गुणधर्मामुळे त्याला फार महत्व आहे. एकदा बांबू लावल्यानंतर त्याचे जीवनचक्र साधारणपणे ४० वर्षांपर्यंत चालू राहते व ४ ते ५ वर्षांपासून सतत नियमितपणे बांबूचे उत्पादन मिळत राहते.
- मानवेल ही बांबूची जात लांब धागा असलेली, जास्त सेल्युलोज असलेली तसेच कोड व रोग प्रतिकारक जात आहे. ही जात गर्द हिरव्या रंगाची असून साधारणपणे ६ ते १८ मीटर उंच वाढते. दोन पेन्यांमधील अंतर २५ ते ४० सेंटिमीटर असून पेच्याजवळचा भाग थोडा फुगीर असतो. या जातीची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दिसून येते. यासाठी बांबू लागवडीची माहिती ही प्रामुख्याने मानवेल जातीविषयी देण्यात येत आहे.
- बाबूपासून कागद, चटया, दांडया, टोपल्या, खोकी, पत्रे, फर्निचरआदि उत्पादने तयार होतात . यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते .
जमीन व हवामान
बांबूला उष्ण व दमट हवामान मानवते आणि जास्त पाऊसमान असलेल्या उष्ण प्रदेशात बांबूची वाढ चांगली होते. तरीही, पाणी देण्याची सोय असल्यास बांबूची लागवड सर्वसाधारणपणे ९ ते ३६ अंश से. तापमान, सरासरी प्रतिवर्षी ७५0 मि.मी. पाऊसमान आणि पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन असणे गरजेचे असते. बांबूची मुळे ही तंतुमय असल्याने ती जमिनीच्या वरच्या भरात वाढतात. त्यामुळे जमीन उथळ असली तरी चांगली निचरा होणारी भुसभुशीत असावी लागते. अशा जमिनीत बांबूच्या कंदाची वाढ चांगली होते. क्षारपड, चिबड अथवा पाणथळ जमिनीत बांबूची लागवड करू नये. अशा जमिनीत बांबू जरी होत नाही.
उत्पादन
लागवड पद्धती व रोपांची देखभाल यांवर मुख्यत्वे बांबूचे उत्पादन अवलंबून असते. बांबूचे उत्पादन लागवडीनंतर चौथ्या वर्षापासून सुरू होते. ५ × ५ मीटर अंतरावर लागवड केल्यास हेक्टरी ४,००० रोपे बसतात व त्यामधून पाचव्या वर्षी २,००० रुपये मिळतात. बाजारात किरकोळ विक्रेत्याकडून प्रतिनग १५ रुपये प्रमाणे एकूण ३० हजार रुपये उत्पन्न हेक्टरी मिळण्यास सुरवात होते.बांबूची लागवड केल्यानंतर सलग ४o वर्षांपर्यंत उत्पादन मिळते. म्हणजेच एकदा लागवड केल्यानंतर पाणी व खते देण्याशिवाय प्रत्येक वर्षी इतर कसलीही मशागत करावी लागत नाही. शिवाय, दरवर्षी बांबूचे उत्पादन १० ते १५ टक्क्यांनी वाढते. हलक्या जमिनीत तसेच प्रतिकूल वातावरणातदेखील सहाव्या वर्षापासून २ इंच व्यासाचे व १८ फूट लांबीचे बांबू मिळतात.
बांबू लागवड माहिती
- बांबूची लागवड करताना मागणी नुसार जातींची लागवड करावी.
- बांबूची लागवड करताना 3 x 2.5 मीटर अंतरावर एक रोप लावलं तर सुमारे एक हेक्टर क्षेत्रात 1500 झाडे लावली जातील.
- बांबूची लागवड करताना वसंत ऋतूमध्ये बांबू नवीन काड्या (कळसे) तयार करतो.
- बांबूची लागवड करताना हे कोंब जमिनीतून बाहेर पडतात आणि उंची आणि व्यासात सुमारे ६० दिवस वाढतात.
- बांबूची लागवड करताना या ६० दिवसांच्या कालावधीत, ते फांद्या आणि पाने तयार करतात.
- महाराष्ट्र शासनाने अटल बांबू समृध्दी योजना सूरु केलेली आहे.
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत बांबू लागवड करता येते.