पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना राज्यभर राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत राबविली जात आहे. या योजनेमधून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली जाणार आहे. पर्यावरणातील होत असलेले बदल त्याचा शेती व शेती उद्योगावर होत असलेले वाईट परिणाम कमी करण्यासाठी वृक्ष लागवडीचा उपयोग करून घेता येणार आहे. यासाठी वृक्ष लागवडीचे नियोजन व व्यवस्थापन या गोष्टीविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे.
रोपांचे नियोजन
झाडांची निवड लागवडीपूर्वी करावी. लागवडीसाठी दर्जेदार रोपे होण्यासाठी दर्जेदार बियाणे मिळणे आवश्यक असते. यासाठी विद्यापीठे, सरकारी संस्था, स्वयंसेवी संस्थांकडे संपर्क करणे आवश्यक आहे. बियाणे मिळाल्यानंतर रोपवाटिका तयार करणे हा वृक्षलागवड यशस्वी करण्यासाठी महत्त्वाचा भाग आहे. रोपवाटिकेच्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊ शकतो. रोपे दर्जेदार होण्यासाठी रोपे बनविण्यासाठी लागणाऱ्या पिशवी 5 x 8 सें.मी. किंवा त्यापेक्षा मोठी असणे आवश्यक आहे. लागवडीसाठी रोपे आकाराने मोठी, धष्टपुष्ट, दर्जेदार असणे आवश्यक आहे. यासाठी रोपवाटिकेसाठी वापरल्या जाणाऱ्या मातीत आवश्यकतेनुसार वेळोवेळी खते मिसळणे आवश्यक आहे. बियाणे पेरणीपूर्व त्यास संस्काराची गरज आहे किंवा नाही हे बघणे आवश्यक आहे. अन्यथा, बियाणे वाया जाण्याची शक्यता असते. बियाणे उगवून आल्यानंतर संप्रेरके, विद्राव्य खते इत्यादींची फवारणी रोपे चांगली होण्यासाठी फायदेशीर ठरते. रोपांना सावलीसाठी शेडनेटचा वापर करावा. पाण्याच्या व्यवस्थापनासाठी रोपवाटिकेत तुषार सिंचनाचा वापर करावा. या सर्व गोष्टींमुळे आपणास लागवडीसाठी दर्जेदार रोपे मिळतील.
वृक्ष लागवडीचे महत्त्व:
- हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यास मदत होते.
- हवेची गुणवत्ता सुधारते.
- पाण्याचे संरक्षण होते.
- मातीचे रक्षण होते.
- वन्यजीवांना आधार मिळतो.
- शहराचे आरोग्य चांगले राहते.
- परिसर समृद्ध आणि संपन्न होतो.
वृक्ष लागवड करण्यासाठी काही गोष्टी:
- कुठल्या जागेवर कोणते झाड लावायचे याची माहिती असणे आवश्यक आहे.
- रोपे कशी करावी, खड्डे कसे आकारायचे याची माहिती असणे आवश्यक आहे.
- लागवडीनंतर पाणी, खते व्यवस्थापन, सावली, जनावरांपासून संरक्षणाचे नियोजन करणे आवश्यक आहे.
- स्थानिक वृक्ष प्रजाती लावावीत कारण त्या स्थानिक हवामानाशी चांगल्या प्रकारे जुळवून घेतात.
- भारतातील काही लोकप्रिय पर्यायांमध्ये कडुनिंब, वड, पिंपळ, आंबा आणि साग यांचा समावेश आहे.