शेडनेट हाऊस म्हणजे शेतातील तापमान, आर्द्रता व कार्बन डायॉक्साइडच्या प्रमाणावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्यासाठी उभारलेला मांडव यालाच शेडनेट असे म्हणतात. याचा वापर हंगामी व बिगर हंगामी पिके घेण्यासाठी, जास्त मूल्यांची भाजीपाला पिके व फुलांच्या उत्पादनासाठी करण्यात येतो.
शेडनेट हाऊसचा उपयोग प्रामुख्याने हंगामी व बिगर हंगामी पिके घेण्यासाठी, उच्च मूल्यांची भाजीपाला पिके व फुलांच्या उत्पादनासाठी करण्यात येतो. शेडनेट हाऊसमध्ये आपणास तापमान, आर्द्रता व कार्बन-डाय- ऑक्साईडच्या प्रमाणावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवता येते.
शेडनेट वापर प्रामुख्याने समशीतोष्ण भागात केला जातो आणि ग्रीन हाऊस आणि क्लॉच सारख्याच पद्धतीने वापरले जातात. आधुनिक रचनांनुसार, लागवड आणि कापणी यंत्र या रचनांच्या आतून उत्पादन स्वयंचलित करण्यासाठी तयार होतात.