शेततळे म्हणजे, शेतजमिनीवरून वाहून जाणारे पाणी साठवण्यासाठी खोदलेले तळे.
जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी, मत्स्य उत्पादनासाठी, पिण्यासाठी, घरगुती उपयोगासाठी व जनावरांना पाणी पिण्यासाठी शेततळ्याचा उपयोग होऊ शकतो. ज्या ठिकाणी जमीन जवळ जवळ सपाट असेल त्या ठिकाणी खड्डा खोदून तळे तयार करावे, तर काही ठिकाणी नैसर्गिक घळ अथवा ओघळ अडवून किंवा नाला शेताजवळून वाहत असल्यास त्याला ध्अडवून शेततळ्यात पाणी साठवता येते
शेततळ्याबद्दल माहिती खालीलप्रमाणे:
- शेततळे हे नाला ओघळीचे काठावरील पड क्षेत्रात घेतले जाते.
- शेततळ्यात भूपृष्ठावरून वाहून जाणारे पाणी साठवून त्याचा उपयोग संरक्षित जलसिंचनासाठी केला जातो.
- शेततळ्यातील पाझर कमी करण्यासाठी शेततळ्यास अस्तरीकरण करणे गरजेचे आहे.
- शेततळ्यातील पाणी जमिनीमध्ये मुरून वाया जाऊ नये यासाठी विशेष प्रकारच्या प्लॅस्टिक फिल्मचा अस्तरीकरणासाठी वापर करावा.
- शेततळ्याचा कार्यक्षम वापर करणे आवश्यक आहे.
- शेततळ्याची संपूर्ण माहिती आणि तयार करताना कोणती काळजी घ्यावी याबद्दल माहिती YouTube वर उपलब्ध आहे.
वैशिष्ठये
- UV स्टॅबिलाईजड :- यात वापरल्या जाणाऱ्या केमिकल्स मुळे उन्हाच्या परिणामाची तिव्रता कमी होते व लायनिंगचे आयुष्य वाढते.
- ५५० मायक्रोन पेक्षा जास्त जाडी.
- २४ फूट रुंद (पन्हा)
- Is १५३५१:२०१५ प्रमाणित
- सर्व शासकीय अनुदानास पात्र
- शेत तळ्याच्या आकारात बनविता येते.
- १००% गळती विरोधक :- त्यामुळे पाणी टिकून राहते. ह्या सगळ्या वैशिष्ठया मुळे शेततळ्यातील पाणी जास्तकाळ साठवुन ठेवता येते. परिणामी शेतकऱ्यांचा फायदाच होतो.
शेततळ्याचे आकारमान ठरविताना पडणारा पाऊस व त्याची तीव्रता, पाणलोट क्षेत्राचा आकार व त्याचे गुणधर्म, तळ्याकरिता उपलब्ध जागा, भिजवावयाचे क्षेत्र व त्यात घ्यावयाची पिके निश्चित करावी. शेततळ्यात पाणी आत आणणारा चर व बाहेर पाणी वाहून नेणारा चर दगड किंवा गवत लावून व्यवस्थित ठेवावा. जेणेकरून वरील भागातील माती शेततळ्यात वाहून येणार नाही.शेततळ्याच्या योजनेचा प्रस्ताव संबधीत तालुका कृषि अधिकारी यांचे कडे सादर करावा लागतो. ज्या ठिकाणी शेततळे बांधावयाचे आहे तो परीसर शक्यतो पावसाच्या पाण्यावर अवलंबून असावा. कँनाल लाभ क्षेत्रामध्ये शेततळे खोदावयाचे असल्यास पाटबंधारे खात्यातर्फेना हरकत दाखला घेणे बंधनकारक आहे. आपल्या शेतामध्ये पडणाऱ्या पावसाचे पाणी शेततळ्यामध्ये साठवून गरजेप्रमाणे वापरता येते. तसेच परीसरातील भुगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी शेततळ्याचा उपयोग होतो.