व्यवसाय कसा कराल
मुळात हा व्यवसाय मुक्त गोठ्या मधेच गायी-म्हैशी सोबत केला जाऊ शकतो, त्या साठी वेगळे काही करायची गरज नाही. देशी किंवा गावरान क्रॉस जाती ह्या अतिशय काटक अणि उत्तम रोगप्रतिकार क्षम असतात.
कुक्कुट पालन करत असताना जातीची निवड ही तुम्ही कोणत्या मार्केट साठी व्यवसाय करू इच्छिता यावर अवलंबून आहे .
मुख्य करून अंडी आणि मांस उत्पादन हे उद्दिष्ट असू शकते.
नियोजन
- अंडी उत्पादन घेण्याच्या दृष्टीने पहिल्या दिवसा पासून स्वतंत्र नियोजन करावे.
- गावरान अंडी उत्पादना साठी पक्षी संभाळताना चार मुख्य टप्प्यामध्ये व्यवसाय करावा लागतो.
- गावरान जातीची किंवा गावरान क्रॉस जातीची एक दिवसाची पिल्ले घेऊन या व्यवसायची सुरुवात करावी। त्यासाठी आपल्या नाजिकच्या मध्यवर्ती अंडी उबवनि केंद्रातून पिल्ल खरेदी करावीत.
कुक्कुट पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक गोष्टी –
कुक्कुट पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्यामध्ये मुख्यतः शेड बांधणी, कोंबड्यांची निवड, खाद्य आणि पाणी व्यवस्थापन, कुक्कुट पालनासाठी आवश्यक जागा, वीज पुरवठा, आणि बाजारपेठेतील मागणी यांचा विचार करावा लागतो.
कुक्कुटपालन व्यवसायाचे फायदे
- कमी गुंतवणूक, अधिक नफा: कमी गुंतवणुकीत जास्त फायदा मिळविण्यासाठी कुक्कुट पालन व्यवसाय एक उत्तम पर्याय आहे.
- जलद उत्पादन: ब्रोइलर कोंबड्या ४० ते ४५ दिवसांत विक्रीसाठी तयार होतात, त्यामुळे जलद नफा मिळतो.
- सरकारी अनुदाने: महाराष्ट्रातील कुक्कुट पालनासाठी विविध अनुदाने आणि योजनांचा लाभ घेता येतो.
- कमी जागेतील व्यवसाय: कोंबड्या पाळण्यासाठी फार मोठी जागा लागते नाही, त्यामुळे छोटे शेतकरीही हा व्यवसाय करू शकतात.
- यासाठी खाद्याचा खर्च अत्यल्प अथवा नगण्य येतो. कोंबड्या ह्या गावात अथवा क्षेत्रात मोकाट फिरून आपले खाद्य प्राप्त करतात.
- परसातील कुक्कुट पालन हा महिला सक्षमीकरण करत असताना महिलांना रोजगार उपलब्ध करून देणेकरीता उत्तम पर्याय आहे. ह्यामुळे महिलांना घरात मुलांसाठी एक पोषक आहाराचा पर्याय मिळतो.